मुंबई | देवेंद्र फडणवीस हे 80 तासांसाठी मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी केंद्राचे 40 हजार कोटी वाचवले, असा खळबळजनक दावा भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी केला आहे. मात्र देवेंद्र फडणवीसांनी हा दावा फेटाऴून लावला आहे.
केंद्राला एक नवा पैसाही पाठवला नाही. तसेच केंद्राकडून पैसा आलाच नाही, असं माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी अनंत कुमार हेगडे यांच्या दाव्यावर स्पष्टीकरण दिलं.
देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करणं ही एक चाल होती. फडणवीस हे 80 तासांसाठी मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी केंद्राचे 40 हजार कोटी वाचवले, असा दावा अनंत कुमार हेगडे यांनी केलाय.
दरम्यान, अनंत कुमार हेगडे हे नेमकं काय बोलले हे मला माहित नाही. पण जे काही माध्यांकडून समजतंय त्यावरून अनंत हेगडे यांचा दावा शंभर टक्के खोटा आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
फडणवीस, हेगडे काय बोलतात ते खरं हाय का?? सचिन सावंतांचा सवाल https://t.co/pA0E4R9jQI @sachin_inc @Dev_Fadnavis @BJP4India
— थोडक्यात (@thodkyaat) December 2, 2019
“कुवत नसली की अनेकांना सह्याद्री टेकाडा सारखा दिसतो”- https://t.co/f0TMDbP19S @Dev_Fadnavis @rautsanjay61
— थोडक्यात (@thodkyaat) December 2, 2019
केंद्राचे 40 हजार कोटी वाचवण्यासाठी फडणवीस 80 तासांचे मुख्यमंत्री; भाजप खासदाराचा गौप्यस्फोट https://t.co/Ka6wi2ofZ5 @BJP4India @Dev_Fadnavis
— थोडक्यात (@thodkyaat) December 2, 2019
Comments are closed.