मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी प्रकरणात उच्च न्यायालयाने स्यूमोटो याचिका दाखल करण्याची मागणी केली.
अर्णब गोस्वामी यांना ज्याप्रकारे वागणूक दिली जात आहे, याबाबत बऱ्याच चर्चा सुरु आहेत. या सगळ्याची न्यायालयाने दखल घ्यावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
उच्च न्यायालयाने सोमवारी झालेल्या सुनावणीत अर्णव गोस्वामी यांचा अंतरिम जामिनासाठीची अर्ज फेटाळला आहे. तसेच जामिनासाठी सत्र न्यायालयात याचिका करण्यास सांगितलं आहे.
अर्णब गोस्वामी यांना जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घ्यावी लागणार असून सत्र न्यायालयातून जामीन मिळेपर्यंत त्यांना तळोजा तुरुंगातच राहावं लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
तासाभरात 1 महिन्याचा, तर दिवाळीपूर्वी 2 महिन्यांचा पगार आणि बोनस जमा करणार- अनिल परब
अर्णब गोस्वामींना अंतरिम जामीन नाहीच, कोर्टाने अर्ज फेटाळला
महाविकास आघाडी सरकार गेंड्याच्या कातडीचं आणि संवेदनाहीन, गिरीश महाजन यांची टीका
“उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटीच नाही, तर मराठी सिनेमेही बनवणार”
“राज्यपालांनी अर्णब गोस्वामींची चिंता करु नये, सरकार त्यांची योग्यप्रकारे काळजी घेतय”