मी अभिमानाने सांगतो बाबरी पाडताना मी तिथंच होतो- देवेंद्र फडणवीस
मुंबई | बाबरी मशिद पाडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते? मंदिरासाठी यात्रा सुरु होती तेव्हा राज ठाकरेचं काय सुरु होतं? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला होता. याला आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
भाजपच्या पोलखोल सभेतून देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
मी अभिमानाने सांगतो मी तिथेच होतो, शिवसेनेचा एकही नेता नव्हता, असं म्हणत फडणवीसांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
कारसेवकांनी बाबरीचा ढाचा पाडला त्यात शिवसेनेच्या कोणत्याही नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला नाही. भाजपच्या 30 जणांवर गुन्हे दाखल झाले असंही त्यांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“देवेंद्रजी खरंच 30-35 पोळ्या खायचे?”, अमृता फडणवीस म्हणाल्या…
“देवेंद्रजींनी सांगितलं म्हणून काही ट्विट डिलीट केल्या, नाहीतर मी कोणाच्या बापाला…”
“मी पुन्हा येईन म्हटलो पण केव्हा सांगितलं नव्हतं, अजूनही सांगतो पुन्हा नक्की येणार”
क्रिकेट जगतात खळबळ! जडेजानं दिला कर्णधारपदाचा राजीनामा
“शरद पवार मुख्यमंत्री, विलासराव पत्र घेऊन आले अन्…”, सुशिलकुमार शिंदेंनी सांगितली इनसाईड स्टोरी
Comments are closed.