मुंबई | बर्ड फ्लूचं संकट मोठं आहे. या साथीला थोपवायचं असेल तर वेळीच खबरदरादी घ्यावी लागेल. मोठ्या प्रमाणात कारवाई करावी लागेल, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.
कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे कुक्कुटपालन करणाऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
बालकांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांना आजून कोणतीही मदत मिळाली नाही. अजून ऑडिटही झालेलं नाही, असं म्हणत हे सरकार अतिशय टोलवाटोलवी करणारं असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.
केंद्र सरकारने आरोग्य सेवेच्या बाबतीत माजी पंतप्रधान पंडित नेहरु यांच्याप्रमाणे काम करण्याचा सल्ला आजच्या सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आला आहे. त्यावर बोलताना या विषयावर मी काहीही बोलणार नसल्याचे म्हणत राज्यात आरोग्यमंत्री कुणाचे आहेत?, असा खोचक सवाल शिवसेनेला केलाय.
थोडक्यात बातम्या-
‘…अन्यथा आम्ही कृषी कायद्यांवर बंदी घालू’; सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारलं
“मोदींनी पक्ष्यांना दाणे खायला घातल्याने पक्षी बर्ड फ्लूच्या विळख्यात सापडले”
“बर्ड फ्ल्यू माणसांनाही होऊ शकतो, काळजी घ्या”
मनसेनं सुरु केली ‘पेंग्विन्स गेम्स’ नावाची वेब सिरिज!
सेक्स पोजिशन बदलण्याच्या नादात तरुणाचा मृत्यू प्रकरणी ‘या’ व्यक्तीला अटक