बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कितीही तोडफोड करा, मुंबई महापालिकेत यश मिळवणारच- देवेंद्र फडणवीस

पणजी | राज्य सरकारकडून वॉर्डची पुनर्रचना करण्याच्या नावाखाली आपल्याला हवे तसे वॉर्डची तोडफोड करत आहे. आम्ही निवडणूक आयोगाला तसं कळवलं आहे, पण गरज पडली तर आम्ही कोर्टातही जाऊ, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ते गोव्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

सत्ताधाऱ्यांनी महापालिका निवडणुकांसाठी वॉर्डरचना केली किंवा प्रभागरचना केली तरी मुंबईसह अन्य महानगरपालिकेत आम्हाला चांगलं यश मिळेल, असा विश्वासही देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे.

राज्यात पुढच्या वर्षी मुंबईसह 15 महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या महापालिकेत प्रभाग पद्धती कशी असावी, तसेच नगरपंचायत आणि नगरपालिकांमध्ये प्रभाग पद्धत कशी असावी यावर आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.

15 पैकी मुंबई महापालिकेत सध्याची एक प्रभाग पद्धत कायम राहणार आहे. उरलेल्या महापालिकेत दोन की चार प्रभाग पद्धती असावी यावर आजच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच काही महापालिकेत दोन सदस्य प्रभाग पद्धत रहावी अशी काही नेत्यांची भूमिका आहे

थोडक्यात बातम्या- 

‘…अन् महेंद्रसिंग धोनी भारतीय संघाचा कॅप्टन झाला’; शरद पवारांनी सांगितला तो किस्सा

“…त्यामुळे आता संजय राऊतांनी राजकारण सोडावं”

पंजाबने हातातला सामना गमावला, राजस्थानचा रोमांचक विजय

कोरोना संदर्भात देशासाठी आणखी एक दिलासादायक बातमी समोर!

भारतात दिल्या जाणाऱ्या ‘या’ लसीला ब्रिटनकडून मान्यता नाहीच!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More