Top News

भाजप सर्व निवडणुका स्वबळावर लढणार- देवेंद्र फडणवीस

नागपूर | भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसेसोबतच्या युतीचे वृत्त फेटाळून लावलं आहे. आगामी सर्व निवडणुका भाजप स्वबळावर लढणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

देवेंद्र फडणवीस अमरावती शिक्षक मतदरासंघातील भाजप उमेदवार नितीन धांडे यांच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी ते बोलत होते.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप मनसेला सोबत घेणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर भाजप आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान, राज्य सरकारची भूमिका लोकविरोधी असल्याची घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

…अन् नागरिकांनी नगरसेवकाला चक्क गटाराच्या पाण्यात बसवलं!

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता, पुणेकरांनो काळजी घ्या- अजित पवार

‘सरकारची भूमिका लोकविरोधी आहे’; देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

‘माझे लाईट बिल, माझी जबाबदारी’, शॉकसाठी तयार रहा; मनसेचा सरकारला इशारा

रोहित पवारांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाचं कौतुक, म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या