पुणे महाराष्ट्र

भाजपकडून कोणीही मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही- देवेंद्र फडणवीस

पुणे | भाजपकडून कोणीही मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. देवेंद्र फडणवीस पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

मला बिहार निवडणुकीत पक्षश्रेष्ठींकडून साहाय्य करण्यास सांगण्यात आलं आहे. मात्र सुशांत प्रकरण आणि याचा काहीही संबंध नाही. महाराष्ट्र पोलिसांवर माझा विश्वास आहे. मात्र पोलिसांनी कोणत्याही राजकीय दडपणाखाली काम करु नये, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

कोरोना संकट सुरु होऊन पाच महिने होत आली. आपण आता लसीची वाट पाहतोय. कोरोनावर लस येईपर्यंत काळजी घ्यावी लागेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मृत्यू दर आणि बाधा रोखली तर आपण बाहेर पडू. कोरोना टेस्ट वाढवण्याची गरज आहे. आता टेस्ट वाढत आहेत. आपण अँटिजन टेस्ट करतोय. पण त्याची विश्वासर्हता कमी आहे, त्यामुळे पीसीआरटी टेस्ट वाढवावी, अशी सूचना देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला केलीये.

महत्वाच्या बातम्या-

‘ही’ भारतीय कंपनी खरेदी करू शकते टिकटॉक

पवार कुटुंबातील प्रश्न एका मिनिटात सुटेल- राजेश टोपे

कर्जबुडव्या विजय माल्ल्याच्या जीवनावर येणार वेबसिरीज

देशात मुलींच्या विवाहाची वयोमर्यादा बदलणार; पंतप्रधान मोदींकडून संकेत

“देवेंद्र फडणवीसांनी 5 वर्ष गृहखातं सांभाळूनही….”; मुश्रीफांचा फडणवीसांना सणसणीत टोला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या