बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काहींना वाटतं हा दिल्लीला गेला तर बला टळेल पण बला टळणार नाही- देवेंद्र फडणवीस

मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे केंदात जाणार असल्याची चर्चा आहे. यावर आता फडणवीसांनी भाष्य केलं आहे. आमच्या पक्षात आमचे नेते नरेंद्र मोदी जो आदेश देतील तो सर्वांसाठी शिरोधार्ह असतो. पण एक गोष्ट सांगतो की, ज्याला भाजपचं, महाराष्ट्राचं राजकारण कळतं त्याला हे कळून येईल की, मी महाराष्ट्रातून कुठेही जाण्याची ही वेळ नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

माझ्या शुभचिंतकांना आनंद होतो की, मला दिल्लीत काही मिळेल. पण मी त्यांना सांगू इच्छितो की माझी दिल्लीत जाण्याची शक्यता नाही. काही लोकांना वाटतं की हा दिल्लीला गेला तर बला टळेल पण बला टळणार नाही, हे देखील मी स्पष्टपणे सांगतो, असंही फडणवीस म्हणाले.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला आव्हान दिलं आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घोषित होऊ द्या. घोषणा झाल्यावर भाजप आपली रणनिती समोर आणेल. पहिल्यांदा राज्य सरकारचा निर्णय समोर येऊ द्या, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

जोपर्यंत त्यांचा अध्यक्षपदाचा निर्णय होत नाही. तोपर्यंत आम्ही कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही. त्यांचा निर्णय झाल्यावर आमची रणनिती समोर येईलच, असा इशारा फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिलाय.

थोडक्यात बातम्या- 

मराठा आरक्षणाची जबाबदारी केंद्रावर म्हणून राज्याने स्वस्थ बसू नये- चंद्रकांत पाटील

“गोपीचंद पडळकर तळागाळातून आलेले, त्यांनी जे भोगलं ते त्यांनी पोटतिडकीने मांडलं”

“दगडफेक केली त्याला योग्य उत्तर दिले जाईल, ही भाजपसाठी धोक्याची घंटा”

नागरिकांनो सावधान! देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ

दिलासादायक! महाराष्ट्रात आजही नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट, पाहा आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More