महाराष्ट्र मुंबई

शेतकरी आंदोलन सुरुच रहावं अशी काहींची इच्छा- देवेंद्र फडणवीस

मुंबई | आंदोलक चुकीचे आहेत, त्यांचा मार्ग योग्य नाही असं मला म्हणायचं नाही. मात्र काही लोक आहेत ज्यांना वाटतं आहे की हे आंदोलन सुरुच रहावं, विधानसभेचे विरोधी पक्षनेते, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी भूमिका बदलली आणि सांगितलं की कायदेच आता रद्द करा. याचा अर्थ काय? की आंदोलकांमध्ये एक समूह असा आहे ज्याला मार्ग नाही काढायचा, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

आपण हे पण पाहिलं आहे की कशाप्रकारचे लोक तिथे पोहचले आहेत. बिहारचा जर विचार केला तर आपण पाहिलं की तेजस्वी यादव म्हणाले की आमचा या आंदोलनाला पाठिंबा आहे. मात्र बिहारने तर APMC च रद्द केल्या आहेत. या कायद्यांमध्ये ती तरतूद नाही. तरीही ते विरोध करत आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

दरम्यान, जे कायदे केंद्र सरकारने आत्ता केले आहेत ते महाराष्ट्राने 2006 मध्येच केले. आता मात्र राजकारण आडवं आलं आहे. शरद पवार यांच्या मुलाखतीतही उल्लेख आहे. तसंच त्यांच्या आत्मचरित्रातही शेतकऱ्यांना बाजारपेठ कशी उपलब्ध करुन दिली पाहिजे याचा उल्लेख आहे, असं फडणवीसांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा- राम कदम

सरकारी कार्यालयातून जिन्स आणि टी-शर्ट हद्दपार; सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता नवीन ड्रेस कोड

…म्हणून नवरदेवाने रागाच्या भरात केलं नवरीच्या बहिणीचं अपहरण!

“आमचे पवार साहेब महाराष्ट्राची शान आहेत, त्यांचा कोणी हातही धरु शकत नाही

कोरिओग्राफर रेमो डिसूझा यांना हृदयविकाराचा झटका!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या