बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आपलं अपयश झाकण्यासाठी छात्या बडवण्याचा कार्यक्रम सुरु- देवेंद्र फडणवीस

मुंबई | मुंबई आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रासंबंधी भ्रम पसरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. आपलं अपयश लपवण्यासाठी छाती बडवण्याचा हा प्रकार आहे. नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर कायम टीका करण्यासाठी काही लोकांना केवळ सोयीच्या गोष्टींचं स्मरण होतं, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

आपलं आपयश लपवण्यासाठी तसंच एकही दमडीचं काम केलं नाही हे लपवण्यासाठी मोदी सरकारवर आरोप केले जात असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारच्या उच्चाधिकार समितीने फेब्रुवारी 2007 मध्ये अहवाल सादर केला होता. 2007 ते 2014 दरम्यान केंद्र किवा राज्य सरकारने कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यासंबंधीच पत्र किंवा साधा अर्जही पाठवण्यात आला नाही. त्याच काळात 2007 साली गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्या संधीचा फायदा घेतला. 2012 पर्यंत कार्यवाही पूर्ण केली आणि काम सुरु केलं, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

डिसेंबर 2019 मध्ये केंद्र सरकारने वित्तीय सेवा केंद्र नियमनासाठी प्राधीकरण गठीत केलं आणि त्याचं मुख्यालय हे अहमदाबाद येथे अधिसूचित केलं आहे. तसेच आज जे लोक गळे काढून ओरडत आहेत ते 2007 ते 2014 या काळात सत्तेत होते आणि त्यांनी मुंबईच्या आयएफएससीसाठी शून्य योगदान दिलं, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

 

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

इरफान गेला पण कुटुंबाची सोय करून गेला; कुटुंबियांसाठी ठेवली इतक्या कोटींची संपत्ती!

लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकलात?, गावी जायचंय, दुसऱ्या राज्यात जायचंय?… वाचा काय आहे प्रक्रिया?

महत्वाच्या बातम्या-

‘मी काही गमावलं नाहीये…’; इरफान खानच्या पत्नीची काळजाला भिडणारी पोस्ट

“100 टक्के लोकसंख्येला मोफत कॅशलेस विमा संरक्षण देणारं महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य”

तबलिगी जमातने जाणूनबुजून कोरोना पसरवला, कारवाई करणारच- योगी आदित्यनाथ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More