Top News

एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

मुंबई | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली.

मला एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याची अधिकृत माहिती नाही. अधिकृतरित्या राजीनामा दिल्याचे कळल्यावरच मी यावर बोलेन, असं फडणवीस म्हणालेत. तसेच आमचे अध्यक्ष हे आधीच खडसेंसोबत बोलत आहेत, तेच याबद्द्ल सांगू शकतील, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब होत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याबाबत अधिकृत घोषणा केली.

एकनाथ खडसे यांच्यासोबत भाजपचे अनेक नेते आणि स्थानिक पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार- जयंत पाटील

कांद्याचे दर वाढले म्हणून बोंबलू नका, परवडत नसेल तर…- बच्चू कड

…म्हणून अजित पवारांनी अतिवृष्टी पाहणी दौरा केला रद्द

अतिवृष्टीग्रस्तांना गुरुवारी आर्थिक मदत जाहीर करणार- उद्धव ठाकरे

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या