बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तोपर्यंतच आम्ही विरोधात बसणार आहोत’; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

पुणे | विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पत्रकारांनी आता किती दिवस विरोधात बसणार?, असा सवाल केला. यावर देवेंद्र फडणवीसांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

जोपर्यंत आज्ञा असेल तोपर्यंत आम्ही विरोधात बसणार आहोत, असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी सहकार खात्यावरून भाजपवर टीका केली होती. त्यावर फडणवीसांनी राऊतांना फटकारले. राऊतांना सर्व गोष्टी माहीत आहेत, असं तुम्हाला का वाटतं? तेच पंडित आहेत, त्यांनाच सर्व काही समजतं. त्यांनाच संविधान समजतं हा तुमचा गैरसमज आहे. इतके वर्ष एनसीडीसीच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये केंद्राने राज्याला दिले. ते कशाच्या अखत्यारीत दिले होते?, असा सवाल फडणवीसांनी केला.

इंधन दरवाढीवरून सत्ताधारी आघाडीने केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्यावरही फडणवीसांनी भाष्य केलं. या सरकारमधील एखाद्या मंत्र्याला त्याच्या बायकोने मारलं तरी हे म्हणतील त्यात केंद्राचा हात आहे, असा टोला फडणवीसांनी लगावला.

थोडक्यात बातम्या- 

भारत-श्रीलंका मालिकेवर कोरोनाचं सावट; वनडे आणि टी 20 मालिकेच्या वेळापत्रकात बदल

“कोरोनापासून कधीच सुटका होणार नाही, तो पूर्णपणे आपल्यातून जाणार नाही”

देशात ‘समान नागरी कायदा’ लागू करण्याची वेळ आली- दिल्ली उच्च न्यायालय

दोन डोस घेतल्यानंतरही मृत्यू होतात, हे गांभीर्याने घ्या- अजित पवार

“मी विधानसभा अध्यक्ष होण्यास तयार, पण शिवसेनेनं वनमंत्रिपद सोडू नये”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More