महाराष्ट्र मुंबई

राज ठाकरेंची मराठी माणसाबद्दलची भूमिका मान्य, पण…- देवेंद्र फडणवीस

मुंबई | राज ठाकरे यांची भूमिका भाजपला पूरक ठरेल का किंवा त्यांना सोबत घेतल्यास फायदा होईल का? हे आज सांगता येणार नाही. आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत. आमची व्यापक भूमिका आहे, असं रोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.

राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे मनसे आणि भाजप एकत्र येईल का? असा सवाल फडणवीसांना विचारण्यात आला. यावर फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलं.

हिंदुत्वाचा विचार कुणी मांडत असेल तर त्याचं आकलन निश्चितपणे करता येईल. पण आजतरी आम्ही ते केलेलं नाही. सध्या तरी आमचे जे छोटे मित्र आहेत त्यांच्या भरोशावरच आम्हाला निवडणूक लढवायची आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

आम्ही व्यापक हिंदुत्ववादी आहोत. या देशाची संस्कृती जे आपली मानतात अशा सर्व लोकांना आम्ही हिंदुत्वाच्या व्याख्यात घेतलं आहे. कुणाची व्याख्या आमच्या व्याख्याशी जुळली तर त्यांना सोबत घ्यायला आम्हाला हरकत नाही. पण आजतरी आम्ही लक्ष ठेवून आहोत, असं फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

‘भारत बंद’ यशस्वी करून झोपी गेलेल्या केंद्र सरकारला जागं करा- अशोक चव्हाण

‘परिस्थिती सुधारली नाही तर…’; छगन भुजबळांचा नाशिककरांना इशारा

“राहुल गांधी आणि कुटुंब पार्टटाईम राजकारण करतात, शेतकऱ्यांशी काही देणं घेणं नाही”

“भारत बंदमध्ये शेतकरी संघटना सहभागी होणार नाही”

शेतकऱ्यांचं आंदोलन राजकीय हेतूने सुरू असल्याचं वाटतं- अनुपम खेर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या