महाराष्ट्र मुंबई

कोरोना विरोधातील लढाईत नरेंद्र मोदी यांचं काम जगात सर्वोत्तम- देवेंद्र फडणवीस

मुंबई | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे आणि धाडसी निर्णयामुळे 130 कोटी लोकसंख्या असलेला भारत देश कोरोनाच्या हाहाकारापासून सुरक्षित राहू शकला, असं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने कोरोना विरुद्धच्या लढाईत केलेल्या कामाची भाजप मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर लिखित पुस्तिका आणि माहितीपट ’56 इंचाची ढाल’ चे प्रकाशन फडणवीसांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होत.

नरेंद्र मोदी यांचे काम सामान्य माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी तयार केलेल्या माहितीपटाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी आमदार अतुल भातखळकर यांचे अभिनंदन केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काम जगात सर्वोत्तम आहे. कोरोनाच्या विरुध्द संपूर्ण देशाने एकत्र येऊन लढण्याची आवश्यकता होती. पण प्रत्येक गोष्टीत विरोध करण्याची मानसिकता असणाऱ्या विरोधी पक्षांनी निरर्थक आरोप करण्याचंच काम केलं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

करुणासोबत सहमतीनं संबंधात; आम्हाला दोन मुलंही आहेत- धनंजय मुंडे

बलात्काराच्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांचा अत्यंत धक्कादायक खुलासा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र; मराठा आरक्षणप्रश्नी केली ‘ही’ मागणी

सर्वोच्च न्यायालयाकडून कृषी कायद्यांना स्थगिती, शरद पवार म्हणाले…

“राम मंदिराची निर्मिती करणं हे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचं स्वप्न होतं”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या