मुंबई | मी एक घोषणा केली होती दिवाळीनंतर काही गोष्टी समोर आणणार आहे. उशीर झाला, काही लोकांच्या पत्रकार परिषद सुरु होत्या. मी जे सांगणार आहे ती सलीम जावेद यांची कथा नाही. तो इंटरवल नंतरचा चित्रपट नाही. हा एक देशाच्या सुरक्षेबद्दलचा प्रश्न आहे, असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नवाब मलिकांच्या कुटुंबीयांकडून अंडरवर्ल्डच्या लोकांकडून जमीन खरेदी करण्यात आल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
कुर्ला येथे एलबीएस रोडवरील 1 लाख 23 हजार स्केअर फूटची जागा होती. त्याला गोवावाला कंपाऊंड म्हणतात. या जमीनीची एक रजिस्ट्री स़ॉलिडस नावाच्या कंपनीसोबत झाली, अशी माहिती फडणवीसांनी दिलीये. या जमिनिची विक्री सलिम पटेल आणि शाहवली खान यांनी केली. हे दोघेही दाऊदची माणसं होती. ही सॉलिडस कंपनी मलिकांचा आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.
सरदार शाहवली खान 1993 बॉम्बब्लास्टचा गुन्हेगार आहे. त्याला जन्मठेपेची शिक्षा मिळाली असून तो तुरुंगात आहे. टायगर मेमनच्या नेतृत्वात फायर ट्रेनिंगमध्ये सहभागी झाला होता. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि मुंबई महापालिकेत बॉम्ब कुठे ठेवायचा याची रेकी शाहवली खानने केली होती. बॉम्ब ब्लास्टबाबत जी बैठक झाली त्यावेळी हा हजर होता. गाडीच्या आत आरडीएक्स भरण्यात आले तोच हा शाहवाली खान होता, असं त्यांनी सांगितलं.
थोडक्यात बातम्या-
“लोकांनी निवडून दिलं तर यांनी देशच विकायला काढला”
पेट्रोल- डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या किंमत
नवाब मलिकांच्या अडचणींत वाढ; मानहानीच्या खटल्यानंतर आणखी एक तक्रार दाखल
‘तुम्ही ट्विटरवर उत्तर देता ना, तर मग इकडेही द्या’; न्यायालयाने नवाब मलिकांना फटकारलं
“भाजपमध्ये घराणेशाही नसेल, पण पक्ष व्यक्तिकेंद्रित झालाय”
Comments are closed.