महाराष्ट्र मुंबई

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा- देवेंद्र फडणवीस

मुंबई | विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहिलं आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी विनंती देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.

महाराष्ट्रातील कांद्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी आहे आणि यामुळे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना योग्य भावही मिळतो. निर्यातीवर बंदी घालण्यात आल्याने शेतकरी हताश, निराश झाले आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय.

मी याआधी आपल्याशी याविषयावर संवाद साधला आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की निर्यातबंदी तात्काळ उठवावी, असं फडणवीस म्हणालेत.

फडणवीसांपूर्वी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही भाजप सरकारला घरचा अहेर दिला. केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचं उदयनराजेंनी म्हटलंय.

 

महत्वाच्या बातम्या-

कंगणाला ग्रामपंचायत निवडणुकीला उभं केलं तरी…; बच्चू कडूंनी कंगणाची उडवली खिल्ली

प्रशासनाने मराठा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तर…- खासदार संभाजीराजे

सुरेश रैनाच्या नातेवाईकांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी 3 जणांना अटक!

राजू शेट्टी यांची कोरोनावर मात, पुण्यातील रूग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

पुण्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते वसंतराव वाणींचं निधन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या