बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही, पण अंगावर आलं तर सोडत नाही- देवेंद्र फडणवीस

मुंबई | भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर चांगलीच खळबळ उडाली. राज्यातील शिवसेना नेत्यांनी प्रसाद लाड यांच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला. आता या प्रकरणावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

तोडफोड करणं ही भाजपची संस्कृती नाही. आमच्यासाठी हा विषय संपलेला आहे. तसेच आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही, पण कोणी अंगावर आलं तर सोडत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना प्रसाद लाड यांनी एक चिथावणीखोर वक्तव्य केलं. शिवसेनेला वाटतं की आम्ही माहीममध्ये आल्यावर सेना भवन फुटेल. त्यांना सांगतो की वेळ आली तर आम्ही ते सुद्धा करू, असं प्रसाद लाड म्हणाले. यानंतर शिवसेेना नेत्यांनी प्रसाद लाड यांच्यावर टीकेची झोड उठवली.

दरम्यान, प्रसारमाध्यमांतून माझ्या एका भाषणाचा विपर्यास करून मी शिवसेना भवन फोडणार अशा बातम्या दिसत आहेत. पण मी स्पष्टीकरण देऊ इच्छितो. घाबरण्याचं कोणतंही कारण नाही. जेव्हा आरे ला कारे होईल, तेव्हा कारेला आरेचं उत्तर दिलं जाईल. पण ज्या शिवसेना प्रमुखांवर आम्ही प्रेम करतो. शिवसेना प्रमुखांबद्दल आम्ही आदर ठेवतो. त्या शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेबद्दल माझ्याकडून असं कोणतंही वक्तव्य केलं जाणार नाही, असं सप्ष्टीकरण प्रसाद लाड यांनी दिलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“सेना भवनापर्यंत स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित खांद्यावरच जावं लागेल”

जीवाचं रान करून 16 कोटी जमवले, इंजेक्शनही दिलं पण….; चिमुकल्या वेदिकाची झुंज अपयशी

‘कोरोनाची तिसरी लाट अटळ पण…’; तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

अजब लग्नाची गजब गोष्ट; अन् चक्क वयाच्या 60 व्या वर्षी आजोबा चढले बोहल्यावर

बलात्कारानंतर आरोपीशी लग्न करण्यासाठी पीडितेची सर्वोच्च न्यायालयात धाव अन्..; चक्रावुन टाकणारा प्रकार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More