Top News

राहुल गांधी सावरकरांच्या नखाची सुद्धा सर करु शकत नाही- देवेंद्र फडणवीस

मुंबई | मी काही राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. त्यामुळे माफी मागणार नाही, असं म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधींनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. राहुल गांधींनी वीर सावरकर यांच्या नावाचा उल्लेख केल्यामुळे भाजपने आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसत आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राहुल गांधींच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं विधान अतिशय निंदनीय आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नखाची सुद्धा बरोबरी करू शकत नाही आणि स्वतःला ‘गांधी’ समजण्याची घोडचूक तर त्यांनी अजिबात करू नये. केवळ आडनाव गांधी असल्याने कुणी ‘गांधी’ होत नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे, असा टोलाही देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींना लगावला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्या जीवनाची आहुती मातृभूमीसाठी दिली. त्यांच्याबद्दल अशी भाषा वापरणं, हा देशासाठी परमोच्च त्याग करणाऱ्या तमाम देशभक्तांचा अवमान आहे. त्यामुळे आता आणखी एका वक्तव्यासाठी राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या