बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवारांना चुकीची माहिती देण्यात आली; फडणवीसांनी दाखवला पुरावा!

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत पुरावा दाखवत अनेक गोप्यस्फोट केले आहेत.

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा बचाव करताना शरद पवार यांच्या तोंडून चुकीची माहिती वदवून घेण्यात आली, असं विधानसभेचे विरोक्षी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. देशमुखांना प्रोटेक्ट केलं गेलं. त्यामुळे ते एक्सपोज झाले होते. 15 तारखेला देशमुख आयसोलेट नव्हते. त्या दिवशी त्यांना अनेक लोक भेटले होते, असा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला.

राष्ट्रीय नेत्याला योग्यप्रकारे माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे दिल्लीतील शरद पवारांच्यापत्रकारपरिषदेत खोटेपणा उघडा पडला. राष्ट्रवादी काँग्रेसने या गोष्टीचा विचार केला पाहिजे, अशी टीका फडणवीसांनी केली आहे. तसेच 15 तारखेचा गृहमंत्र्यांची ही कार्यक्रम पत्रिका आहे. 15 तारखेला ते एका खासगी विमानाने आले होते. 15 तारखेला ते आपल्या घरी होते. पण पोलीस विभागाच्या दैनंदिन कामाचा माझ्याकडे एक कागद आहे, असं सांगत फडणवीसांनी सर्व कागदपत्र माध्यमांसमोर मांडली.

दरम्यान, आपल्याकडे पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटविषयी संवेदनशील माहिती असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला आहे. ही माहिती खूपच संवेदनशील असल्याने मी ती प्रसारमाध्यमांना देऊ शकत नाही. ही माहिती घेऊन मी केंद्रीय गृहखात्याच्या सचिवांना भेटणार आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

फडणवीसांचा ठाकरे सरकारवर ‘डेटा बाॅम्ब’; पत्रकार परिषदेत केला मोठा खुलासा

अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या, ‘हा’ महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता

‘मला पवारांसारखं इंग्रजी येत नाही’; देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला

‘धन्यवाद मोदी सरकार’, राष्ट्रवादीकडून पुण्यात बॅनरबाजी; वाचा काय आहे प्रकरण

नव्या बदलासह नवी ‘Royal Enfield’ लवकरच भारतीय बाजारात धडकणार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More