बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तिघेही एकत्र अंगावर आले, निवडणूक लढले तरी भाजप त्यांना पुरून उरेल”

मुंबई | हिंमत असेल तर पुन्हा निवडणूक घेऊन जनादेश मिळवावा, असं आव्हान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  सरकारला दिलं आहे. तसं झाल्यास भाजपला स्वबळावर सत्ता मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्ती केला आहे. तसेच भाजप तीनही पक्षांना एकटय़ानेही पुरून उरेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

हे सरकार आम्हाला पाडण्याची गरज नाही. एकमेकांमधील विसंवादातून ते पडेल. ते तिघेही एकत्र अंगावर आले किंवा निवडणूक लढले, तरी भाजप त्यांना पुरून उरेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येला राम मंदिर उभारण्याची घोषणा करून ट्रस्ट स्थापन केली आहे. काही जण अयोध्येला जाणार असल्याचं सांगत आहेत. त्यांनी अयोध्येला जरूर जावं. त्यामुळे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या विचारांचे स्मरण होईल, असा टोला फडणवीसांनी शिवसेनेला लगावला आहे.

दरम्यान, 22 तारखेला धरणं आंदोलन केलं जाणार असल्याची घोषणाही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

ट्रेंडिंग बातम्या- 

आबांनी कधीच कुणाचं मन दुखावलं नाही- अजित पवार

“भुंकणारे भुंकत राहतील पण आपण आपलं कीर्तन बंद करु नका”

महत्वाच्या बातम्या- 

काही चुकलं असेल तर माफ करा; अमोल कोल्हे भावूक

“दुसर्‍याला बावळट म्हणता आपला बावळटपणा सगळ्यांना दिसतोय”

वकील आणि कोर्ट म्हटलं की मला हुडहुडी भरते- छगन भुजबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More