विधानसभा निवडणूक 2019

शिवसेना काँग्रेसच्या दबावाला झुकणार नाही अशी अपेक्षा- देवेंद्र फडणवीस

मुंबई | नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेत पास झालं. मात्र राज्यसभेत काँग्रेसच्या दबावानंतर शिवसेनेनं राज्य सरकार टिकवण्यासाठी भूमिका बदलली का?, शिवसेनेने आपली जुनी भूमिका कायम ठेवावी, ते कुणाच्याही दबावाखाली जाणार नाहीत, अशी मला अपेक्षा आहे, असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी रखडलेल्या खातेवाटपावरुन देखील ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. 13 दिवस झाले तरी खातेवाटप नाही, सध्या केवळ स्थगितीच्याच बातम्या येत आहेत, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

नागपुरातील अधिवेशन केवळ नावापुरतं होत आहे, अद्याप खातेवाटपच नाही तर मग उत्तरं देणार कोण?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

दरम्यान, नागपुरात किमान दोन आठवडे अधिवेशन घ्या ही आमची मागणी फेटाळली आहे. शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. ती तातडीने मिळावी ही आमची अपेक्षा आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या