महाराष्ट्र मुंबई

‘फासा आम्हीच पलटणार’; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

File Photo

मुंबई | फासा आम्हीच पलटणार आणि शिडीशिवाय फासा पलटणार, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

मीरा भाईंदर महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या टर्न टेबल लॅडरच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी बोलताना फडणवीसांनी राज्यात सत्तांतर होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

राज्यात सर्वात कमी संख्याबळ असलेली काँग्रेस सत्तेत आहे. त्यांचा आघाडी सरकारला पाठिंबा आहे. तर भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. तरीही हा पक्ष विरोधी पक्षात आहे. ही लोकशाहीची थट्टा आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

राज्यपाल राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत. राज्यपाल हे मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारची नेमणूक करत असतात. त्यामुळे त्यांच्याबाबत बोलताना जपूनच बोललं पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

‘सर्वांना मोफत कोरोना लस देणार’; ‘या’ सरकारने केली मोठी घोषणा

जिथे खिळे ठोकले, तिथे फुलं लावणार; राकेश टिकैत यांची घोषणा

आमचं चुकलं असेल तर माफ करा, पण…- नितीन राऊत

‘गावी सोडलेले आजोबा परत आले’; राकेश टिकैत यांनी 92 वर्षीय शेतकऱ्याला खांद्यावर घेतलं उचलून

“फडणवीसांच्या काळात देशात पेट्रोल डिझेलची सर्वाधिक किंमत महाराष्ट्रात होती”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या