बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तर शेतकरी कर्जमाफीला 400 महिने लागतील- देवेंद्र फडणवीस

मुंबई | महिन्याला केवळ साडेसात हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा विक्रम या सरकारने केला. अशा वेगाने 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी 400 महिने लागतील, असं गणित सांगत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

राज्य सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. एक नवा पैसा शेतकऱ्याला दिला नाही. गाजावाजा करत कर्जमाफी दिली. पण दोन महिन्यात केवळ साडेसात हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा विक्रम या सरकारने केला, अशी टीका फडणवीसांनी  केली.

ज्या गावात शेतकरी कर्जमाफीच्या याद्या जाहीर झाल्या, त्या गावातील 35 टक्केही शेतकरी कर्जमाफीत येत नाहीत. सरकारकडून शेतकऱ्यांची दिशाभूल आणि फसवणूक होत आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

दरम्यान, भाजपने शेतकरी कर्जमाफी आणि महिला अत्याचाराविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. यामुळे विधानसभेचं कामकाज तहकूब झालं.

ट्रेंडिंग बातम्या- 

“आता सुप्रिया ताईंना ‘सेल्फी विथ खड्डे’चा विसर पडला आहे का?”

अजित पवारांनी आपला ‘तो’ शब्द खरा करुन दाखवला!

महत्वाच्या बातम्या- 

देशाला अस्वस्थ करणारी ही दृश्यं तुम्ही पाहिली का?

“भाजपला पाहून जुने दिवस आठवले, आमचेही घसे असेच कोरडे पडायचे”

‘मलंग’ चित्रपटामुळे वाढली दिशा-आदित्यची लोकप्रियता

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More