महाराष्ट्र मुंबई

अहमद भाईंमुळे अनेकांचा शपथविधी झाला, त्यांनी अनेकांना मुख्यमंत्री, मंत्री बनवलं- देवेंद्र फडणवीस

मुंबई | ज्या व्यक्तीने अनेक मुख्यमंत्री, मंत्री बनवले त्यांनी स्वत: मंत्री बनण्याचा विचार केला नाही. अनेकांचा शपथविधी त्यांच्यामुळे झाला. पण त्या कार्यक्रमात हजर राहण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. पाठीमागे उभं राहून पक्षाला कशाप्रकारे मजबुती देता येईल, असाच प्रयत्न नेहमी ते करायचे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अहमद पटेल यांच्या आठवणींना उजाळा दिला.

अहमद पटेल यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीनं करण्यात आलं होतं. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते.

सर्वच पक्षात मंत्री बनायला अनेक लोक असतात. पण संघटन चालवण्याचं काम करणारे कमी असतात. संघटनाचे काम चालवणारे अहमद पटेल होते. त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.

देशाच्या एकूण राजकारणात प्रचंड मोठं स्थान अहमद भाईंनी मिळवलं होतं. काँग्रेसची संघटन वाढण्याचं काम ते करत होते. माझा आणि त्यांचा फार परिचय येऊ शकला नाही. पण दोन वेळा त्यांची भेट झाली होती. एकदा तर आमच्या गप्पादेखील झाल्या होत्या. त्यांचा सन्मान खूप मोठा होता. पण तरीही ते अतिशय साधेपणाने वागत, साधेपणाने राहत, असं फडणवीस म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

गुड न्यूज! अमेरिकेमध्ये कोरोना लसीकरणाला सुरुवात, आरोग्य सेविकेला दिला पहिला डोस

अधिवेशन आणि कॅबिनेटच्या बैठका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नको आहेत- नारायण राणे

शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाही तर मी पुन्हा उपोषणाला बसणार- अण्णा हजारे

‘आधी आमदार-खासदारांना कोरोनाची लस द्या’; हरियाणा सरकारचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पत्र

“काँग्रेसच्या डावपेचांचा शोध लावायचो, तेव्हा कळायचं त्यामागे अहमदभाई आहेत”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या