मोदींसमोर देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले…
मुंबई | मुंबई नगरीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं(Narendra Modi) साडेचार वाजता आगमन झालं आहे. मोदींच्या हस्ते गुरूवारी 38 हजार कोटी रूपयांच्या विकास कामांचं उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला सव्वा पाचच्या सुमारस सुरूवात झाली आहे.
या कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांनी आपले मनोगत व्यक्त केलं. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर(Uddhav Thackeray) निशाणा साधला.
यावेळी फडणवीस म्हणाले की, मोदीजी तुम्ही सांगतिलं होतं की पाच वर्षाचं डबल इंजिन सरकार आणा.आपल्यावर विश्वास ठेवून महाराष्ट्राच्या जनतेनं डबल इंजिनचं सरकार आणलं. पण काही लोकांनी बेईमानी केली. त्यामुळं गेल्या अडीच वर्षात जनतेच्या मनासारखं सरकार नाही बनू शकलं.
परंतु बाळासाहेब ठाकरे यांचे खरे अनुयानी असलेल्या एकनाथ शिंदे यांनी धाडस केलं आणि तुमच्या कृपेमुळं पुन्हा एकदा राज्यातील जनतेच्या मनासारखं सरकार आलं, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
Comments are closed.