बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कितने आदमी थे?, 50 निकल गये अभी दो ही बचे है’, फडणवीसांनी पुन्हा शिवसेनेला डिवचलं

मुंबई | 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना (Shivsena) आणि भाजपची (BJP) अनेक वर्षांची युती तुटली. तेव्हापासून सख्खे मित्र पक्के वैरी झाले. त्यात शिंदे गटानं वेगळी चुल थाटत भाजपसोबत घरोबा आणि भाजप-सेनेतील वाद शिगेला पोहोचला.
भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) तुफान फटकेबाजी केली आहे. शोले चित्रपटातील डायलॉग मारत फडणवीसांनी शिवसेनेला पुन्हा डिवचलं आहे.

कितने आदमी थे? हे मी विचारू शकतो. 65 मे से 50 निकल गये और सबकुछ बदल गया. अभी दो ही बचे है. त्यांचाही सन्मान आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More