बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“साहेब! जो बुंद से गयी वो हौद से नहीं आती”

मुंबई | शुक्रवारी दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर तुफान फटकेबाजी केली. भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले होते की, मला इच्छा नसतांना मुख्यमंत्री व्हावं लागलं. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यावर गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्याकरिता जनतेला भाबडेपणाचा मुखवटा दाखवला, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. फडणवीसांंच्या या टीकेवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंचा हात मी वर केला होता, असं म्हटलं होतं. आता शरद पवारांच्या या प्रतिक्रियेला देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिलं आहे.

“साहेब! हा किती भाबडेपणा, व्दापार युगात सुईच्या टोका ऐवढी जमीन द्यायला नकार दिल्यामुळे महाभारत घडले. कलियुगात मात्र तयार नसलेल्यांना हात धरून राज्यकारभाराला लावले असे सांगणे म्हणजे कीती भाबडेपणा, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना टोला लगावला आहे.

मुख्यमंत्री पदावर भाष्य करताना “जो बुंद से गयी वो हौद से नहीं आती”, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. यावेळी फडणवीसांनी कलियुग आणि व्दापार युगाचं उदाहरण देत दाखला दिला आहे. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर बोचरी टीका केली होता. त्यावरून देवेंद्र फडणवीसांनी पुनश्च प्रत्युत्तर दिलं होतं.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी बोलताना भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाबाबत जे वचन दिले होते. त्याचं पालन केलं नाही. यामुळे शिवसेनेने वेगळा मार्ग शोधला, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता शिवसेना आणि भाजपमधलं महाभारत काही थांबायचं नाव घेत नाही.

पाहा ट्विट-

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! मनमोहन सिंग यांना डेंग्यूची लागण, प्रकृतीबाबत आली ‘ही’ माहिती समोर

“आम्ही छापा टाकून काटा काढत नाही, काटा काढून छापा टाकतो”

“तुमच्या हिंदुत्वाचा बुरखा फाटका, राज्याला संकुचित मनोवृत्तीचा मुख्यमंत्री लाभला”

धोनी म्हणतो,”मी पुन्हा येईल…, मी कुठं आयपीएल सोडलंय”

ना रोहित ना विराट, बाबर आझम म्हणतो ‘हा’ खेळाडू वर्ल्ड कपमध्ये धमाका करेल

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More