बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…अन्यथा आम्ही उग्र आंदोलन करु’; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा

मुंबई | सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या जिल्ह्यातील ओबीसीचं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील राजकीय आरक्षण रद्द करण्यात आलं होतं. रद्द करण्यात आलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या रिक्त जागांवर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यावरून राज्यातील ओबीसी नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. तसेच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे.

ज्या निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार ओबीसींचं रद्द केलेल्या अतिरिक्त आरक्षणानंतर या निवडणुका होत आहेत. मात्र या निवडणुका रद्द करा अन्यथा भाजप उग्र आंदोलन करेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

सरकारने हस्तक्षेप करुन या निवडणुका रद्द केल्या पाहिजेत. या निवडणुका रद्द केल्या नाही तर भाजप उग्र आंदोलन करेल, असा इशारा मी राज्य सरकारला देतोय. कुठल्याही परिस्थितीत ओबीसींचा विश्वासघात बंद करा, असं माझं राज्य सरकारला आवाहन आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ओबीसी मंत्र्यांनी परवा घोषित केलं की निवडणुका होऊ देणार नाही, आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या निवडणुका जाहीर होतात, हा एक प्रकारचा ओबीसी समाजाचा विश्वासघात आहे. ओबीसींचं राजकीय आरक्षण संपवण्याचा घाट सरकारकडून घातला जातोय. हे आम्ही सहन करणार नाह, असं म्हणत फडणवीसांनी सरकारवर तोफ डागली.

थोडक्यात बातम्या- 

लॉकडाउनमुळे रिचार्ज न करू शकणाऱ्यांना ‘या’ कंपनीकडून मिळणार मोफत रिचार्ज!

महाविकास आघाडीत ठिणगी?, भुजबळ तातडीने मुख्यमंत्र्यांची भेट घेणार!

अहमदनगरमध्ये भाजपला मोठा धक्का; निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची शिवसेनेला टाळी

“परीक्षेला जाताना जसं लहान मुलांच्या पोटात दुखतं तसं महाविकास आघाडीचं झालंय”

काँग्रेस स्वबळावरच लढणार, शब्द दिलाय, आता माघार नाही- नाना पटोले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More