कोल्हापूर | गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांकडून राज्यातील महाविकास आघाडी सरकार संदर्भात विविध भाकित करण्यात येत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकार कोसळणार असल्याच्या अनेक तारखा दिल्या होत्या. त्यातच आता आजरा येथील विकाससंस्थेत बोलत असताना चंद्रकांत पाटलांनी आणखी एक वक्तव्य केलं आहे.
देवेंद्र फडणवीस येत्या वर्षभरात मुख्यमंत्री होतील, असा दावा चंद्रकांत पाटलांनी केला. वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मी आशावाद व्यक्त केला आहे. माझ्या पक्षाच्या नेत्याबद्दल आशावाद व्यक्त करणे चुकीचे आहे काय?, असा सवाल चंद्रकांत पाटलांनी केला आहे.
चंद्रकांत पाटलांनी यावेळी बोलताना मनसे आणि भाजप युतीवर देखील भाष्य केलं आहे. मनसे आणि भाजप युतीचा कोणताही प्रस्ताव नाही, असं चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं आहे. बाळासाहेब थोरातांनी स्वत:च्या अस्तित्वाची चिंता करावी, असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे. तसेच मनसेच्या सभेला परवनगी मिळाली नसती तरीदेखील सभा झाली असती, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान,याआधीही चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून महाविकास आघाडी सरकार पडेल, अशा चर्चा रंगल्या होत्या. भाजप नेते एकीकडे सरकार कोसळणार असल्याचं बोलत आहेत तर महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि मंत्री महाविकास आघाडी सरकार पूर्ण पाच वर्षे चालेलं, असं सांगत आहेत.
थोडक्यात बातम्या-
राज ठाकरेंच्या अडचणी वाढणार?, समोर आली ‘ही’ महत्त्वाची माहिती
“महाराष्ट्रात राहून आपल्या मातृभाषेच्या चित्रपटांसाठी झगडावं लागतंय”; ‘या’ अभिनेत्याची पोस्ट व्हायरल
Mumbai Local: रेल्वे प्रवाशांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा!
काँग्रेसने राज ठाकरेंवर केलेल्या टीकेला चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, वाचा आजचे ताजे दर
Comments are closed.