Devendra Fadnavis | राज्यभरात सध्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’चीच चर्चा आहे. या योजनेच्या लाभासाठी बहिणींची एकच झुंबड उडाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत या योजनेचा महायुतीला मोठा फायदा होऊ शकतो. या योजनेचा अजित पवार गट, एकनाथ शिंदे गट आणि भाजपाकडून जोरदार प्रचार केला जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुलाबी वादळ आणलंय, तर योजनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा शिंदे गटाने पुढे केलाय. अशात भाजपही (Devendra Fadnavis) आता मैदानात उतरली आहे.
भारतीय जनता पक्षाचे राज्यातील अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विटरवर भाजपच्या नव्या अभियानाविषयी माहिती दिली आहे. केंद्रातील मोदी सरकार, राज्यातील महायुती सरकार आणि विशेषतः भारतीय जनता पक्ष हा स्त्री सक्षमीकरणाचा ध्यास घेऊन काम करत असल्याचा दावा त्यांनी या पोस्टद्वारे केला आहे.
यासाठी पक्षातील नेते,कार्यकर्ते अहोरात्र राब राबत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या राखी पौर्णिमेला भाजपकडून एक विशेष कार्यक्रम राबवला जाणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. येत्या 18 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस “लाडक्या बहिणींचा देवाभाऊ” या उपक्रमाद्वारे राज्यातील सर्व लाडक्या (Devendra Fadnavis) बहिणींशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणी साधणार आपल्या लाडक्या देवाभाऊंशी संवाद!
स्त्रीसक्षमीकरण हा ध्यास घेऊन केंद्रातील मोदी सरकार, राज्यातील महायुती सरकार व विशेषतः भारतीय जनता पार्टी अहोरात्र मेहनत घेत आहे. विविध योजना व उपक्रमांच्या द्वारे स्त्रीला सशक्त करण्याचे काम पक्ष व… pic.twitter.com/5hoD2lJSni
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) August 13, 2024
चंद्रशेखर बावनकुळे यांची पोस्ट-
आपला महाराष्ट्र राजमाता जिजाऊ, सावित्री, अहिल्येचा आणि हीच पराक्रमी झाशीची राणी लक्ष्मीबाईंची जन्मभूमी. या मातीतूनच प्रत्येक लेकीला ती शक्ती उपजत मिळाली आहे. पण परिस्थिती अथवा अन्य कारणांमुळे काहीजणींना त्यांच्या मनगटातील ताकद आणि आत्मशक्तीचा विसर पडला आहे. मात्र, भारतीय जनता पार्टी त्यांना त्यांची ओळख करून देण्यासाठी कटीबध्द आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली अनेक दशकं प्रलंबित असलेले महिलांना 33 टक्के राजकीय आरक्षण देणारे नारीशक्ती वंदन विधेयक मंजूर झालं. (Devendra Fadnavis)
“महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना फडणवीसांनीच आणली”
त्याचबरोवर गेल्या 10 वर्षांत महिलांना अनेक योजनांच्या माध्यमातून अनेक संधी उपलब्ध करून दिल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही नारीशक्ती वंदन हाच ध्यास आहे आणि म्हणूनच मध्यप्रदेशमध्ये भाजपाने सुरु केलेली माझी लाडकी बहिण योजना महाराष्ट्रात आपल्या देवाभाऊंनीच (Devendra Fadnavis) लागू केली.
सशक्त महिला म्हणजेच सक्षम महाराष्ट्र असू शकतो. याच उद्देशानं राखी पौर्णिमेच्या पवित्र पर्वावर 18 ऑगस्ट 2024 रोजी राज्यभरात ‘लाडक्या बहिणींचा देवाभाऊ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून समस्त महाराष्ट्राचे लाडके नेते देवाभाऊ लाडक्या बहिणींशी थेट संवाद साधतील. अशी पोस्ट चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
News Title : Devendra Fadnavis will interact with ladki bahin
महत्वाच्या बातम्या-
या राशीच्या व्यक्तींनी वाहने सावकाश चालवा अन्यथा…
Diabetes आणि BP कंट्रोलमध्ये ठेवतील ‘हे’ 5 पदार्थ; वजनही होईल कमी
‘या लोकांसोबत तुला झोपायला लागेल’, सई ताम्हणकरच्या खुलाशाने खळबळ!
“..याची किंमत मोजावी लागली”; घटस्फोटाच्या चर्चेवर अखेर अभिषेकनं सोडलं मौन
बीएसएनएल लाँच करणार 200MP कॅमेरा असलेला 5G फोन! काय आहे यामागचं सत्य