बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लवकरच देवेंद्र फडणवीस घेणार शरद पवार यांची भेट!

मुंबई | महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेगवेगळ्या कारणांनी उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच आता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक होत असताना राज्य सरकारतर्फे कडक लॉकडाऊनचे संकेत दिल्यानंतर विरोधी पक्षाने महाविकास आघाडी सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि शरद पवार यांच्या भेटीवरून काही दिवसांपूर्वी राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. आता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस शरद पवार यांच्या भेटीला जाणार असल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृती संदर्भात चौकशी करण्यासाठी जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. तरी या भेटीत काही राजकीय चर्चा होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महाराष्ट्रात सध्या राजकीय उलथापालथ होत असताना पाहायला मिळत आहे त्यातच फडणवीस आणि पवार यांच्या भेटीनंतर महाराष्ट्रातील राजकारणात आणखी काही स्फोट होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारने कोरोना संदर्भात लागू केलेल्या नियमांबाबत नाराजी व्यक्त केली आहे आणि यामुळे छोट्या व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं.

थोडक्यात बातम्या

नागरिकांनो कुटुंबाची काळजी घ्या!; दिल्लीतील डॅाक्टरांचं कोरोनाबद्दल धक्कादायक निरीक्षण

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कानात काय सांगितलं?; साऱ्या देशाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर उघड

सचिन वाझेंचा लेटरबॉम्ब; अनिल देशमुखांसह महाविकास आघाडीतील 3 मंत्र्यांवर केला गंभीर आरोप

‘शरद पवारांची मनधरणी करण्यासाठी अनिल देशमुखांनी 2 कोटी रुपये मागितले’; सचिन वाझेंचा मोठा गौप्यस्फोट

महेंद्रसिंग धोनीचे ‘सुपर किंग्स’ यंदाही प्ले ऑफसाठी पात्र ठरणार नाहीत; ‘या’ माजी क्रिकेटपटूचा दावा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More