बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…मग हा हट्ट कशासाठी?”, नाराजी व्यक्त करत देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण

मुंबई | कालपासून 94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. नेहमीप्रमाणे यंदाही संमेलन सुरु होताच राजकीय वादाला तोंड फुटल्याच पहायला मिळालं आहे. कारण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नाराजी व्यक्त करत साहित्य संमेलनाला जाणार नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून संमेलनाला वीर सावरकराचं नाव न दिल्याने नाराजी व्यक्त केली आहे. याच कारणाने ते संमेलनाला जाणार नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे, साहित्यातील सर्व अंगानी परिपूर्ण आणि ज्यांनी मराठीला अनेक शब्द दिले त्याचं नाव साहित्य नगरीला न देण्याचा हट्ट कशासाठी?, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

याशिवाय त्यांनी पुढे म्हटलं आहे, या नगरीला कुसुमाग्रजांचे नाव दिले. याचे स्वागतच अं.भा. साहित्य संमेलानाला सुद्धा शुभेच्छा आहेत. पण जेथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील. त्यांचा यथोचित सन्मान होत नसेल. तर तेथे जाऊन तरी काय करायचे? अशा सवाल फडणवीसांनी ट्विटमध्ये विचारला आहे. यामुळे त्यांनी संमेलनाला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, साहित्या संमेलनात नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होत असतात. नाशिक हि वीर सावरकरांची जन्मभूमी असून त्याचं साहित्यातही मोठं योगदान असल्याने या संमेलनाला वीर सावरकराचं नाव देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही संमेलनाला कुसुमाग्रजाचं नाव दिल्याने फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पाहा ट्विट-

थोडक्यात बातम्या-

“साहेब भिजतील म्हणून पाऊस पडला, पण पावसाला काय माहिती साहेब फक्त…”

पाकिस्तानची जगभर नाचक्की! ट्विट करत खुद्द अधिकाऱ्यांनीच केली पोलखोल

“कोण राहुल गांधी?, मी त्यांना ओळखत नाही”

Omicronचा धोका वाढला! द.आफ्रिकेतून आलेल्या महिलेने केलंं असं काही की…

“पुण्यात केवळ शनिवारवाडाच आहे का?”, अमोल कोल्हेंचं ट्विट चर्चेत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More