Top News महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस अतिवृष्टी भागाच्या दौऱ्यावर, शेतकऱ्यांची घेणार भेट

मुंबई | राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने आणि अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं फार नुकसान झालंय. नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दौऱ्यावर जाणार आहेत.

फडणवीस 19 ऑक्टोबरपासून 3 दिवसांचा हा दौरा करणार आहेत. बारामतीपासून त्यांच्या या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. कुरकुंभ, इंदापूर, टेंभूर्णी, करमाळा, परंडा इत्यादी ठिकाणी दौरा करून ते उस्मानाबादकडे रवाना होतील.

पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांनंतर दुसर्‍या दिवशी उस्मानाबाद, लातूर, बीड आणि परभणी या ठिकाणी भेटी देतील. त्यानंतर तिसऱ्या दिवशी हिंगोली, जालना, औरंगाबादचा ते दौरा करणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

कोरोना लसीबाबत सिरम इन्स्टिट्यूटने दिली ही महत्वाची माहिती!

महाराष्ट्रासह संपूर्ण देश बॉलिवूडच्या पाठिशी- अनिल देशमुख

शरद पवार मराठवाडाच्या दौऱ्यावर, शेतीच्या नुकसानीचा आढावा घेणार

राहुल गांधी म्हणतात, देशातील गरीब भुकेला आहे कारण…

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या