बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तरच करोनाविरुद्धचे युद्ध आपल्याला प्रभावीपणे लढता येईल; देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांना विनंती

मुंबई | राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात फडणवीस यांनी ‘आयसीएमआर’च्या निकषांचं तंतोतंत पालन करण्याबरोबरच महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

‘आयसीएमआर’च्या सूचनाचं पालन करण्याची विनंती फडणवीस यांनी केली असून, त्यानंतरच आपल्याला कोरोनाविरुद्धचे युद्ध प्रभावीपणे लढता येईल, असं म्हटलं आहे.

राज्यातील देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कोरोनाच्या स्थितीकडे लक्ष वेधण्याबरोबरच काही गोष्टींचं पालन करण्याची विनंती केली आहे. 15 एप्रिल 2020 रोजी मुंबई महापालिकेने लक्षणं नसलेल्या व्यक्तींची करोना चाचणी बंद करण्याचा निर्णय घेतला. याठिकाणी राज्याच्या सरासरीच्या कितीतरी अधिक नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. हे आपल्याला नाकारता येणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान, आयसीएमआरच्या नव्या निर्देशांप्रमाणे ‘अ‍ॅग्रेसिव्ह टेस्टिंग’ हीच रणनीती आता वापरावी, अशी माझी विनंती आहे, असं फडणवीसांनी म्हटलंय.

ट्रेंडिंग बातम्या-

मोदी सरकार पेन्शनमध्ये 20 टक्के कपात करणार की नाही?; अर्थखात्यानं दिलं स्पष्टीकरण

आपले कार्य निश्चितच चांगले आहे मात्र…; विनोद पाटील यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

महत्वाच्या बातम्या-

जळगावात फेसबुक लाईव्हवर लग्न; नवदाम्पत्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 25 हजार

सरकारचा मोठा निर्णय; इन्कम टॅक्स रिटर्नच्या फॉर्ममध्येही होणार बदल

गरजुसांठी पंचवीस गावांत पेटल्या चुली; बीडमध्ये रोज 5,000 भाकरींचा पुरवठा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More