Top News आरोग्य कोरोना महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीसांचं बिहारमधून उद्धव ठाकरेंना पत्र; केली ‘ही’ मागणी

बिहार | मुंबईत कोरोना संसर्गाचं प्रमाण 2 टक्क्यांनी वाढलंय. त्यामुळे मुंबईसह राज्यातील चाचण्यांची संख्या वाढवा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलीये. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलंय.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भारतातील कोरोना रूग्णांच्या प्रमाणात महाराष्ट्रातील रूग्णांचं प्रमाण हे 22 टक्के आहे. राष्ट्रीय पातळीवर होत असलेल्या चाचण्यांच्या तुलनेत मात्र महाराष्ट्र मागे आहे. महाराष्ट्रात आणि मुंबईत परिस्थिती लवकर पूर्वपदावर आणायची असेल तर चाचण्यांवर भर द्यावा लागेल.

कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असल्याने अर्थव्यवस्था खुली करण्यात अनेक समस्या येतायत. समाजातील प्रत्येक घटक आता प्रचंड आर्थिक अडचणीत असताना आता तरी चाचण्यांवर लक्ष केंद्रीत करावं, असंही फडणवीस म्हणाले आहेत.”

महत्वाच्या बातम्या-

कंगणा राणावतविरुद्ध गुन्हा दाखल करा, वांद्रे कोर्टाचे आदेश

दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरेंचं भाषण व्यासपीठावरुनच होणार- संजय राऊत

गृहमंत्री अनिल देशमुख एकनाथ खडसेंच्या भेटीसाठी रवाना!

देवेंद्र फडणवीस अतिवृष्टी भागाच्या दौऱ्यावर, शेतकऱ्यांची घेणार भेट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या