बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र, पत्रात केले ‘हे’ आरोप

मुंबई | महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस हलाखीची होत असल्याच्या आशयाचं पत्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे. राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेत आणि मुंबईतील वाढत्या मृत्यूदराबद्दल चिंता या पत्राद्वारे व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात फडणवीस म्हणतात, “मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस हलाखीची होतेय. १९ जून रोजी महाराष्ट्रात आतापर्यंतचे सर्वाधिक ३,८२७ रुग्ण आढळून आलेत. याचदिवशी मुंबईतील सर्वाधिक बळींची संख्या ११४ इतकी नोंदवली गेली.”

जून महिन्यातील गेल्या १८ दिवसांचा विचार केला, तर राज्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांच्या संख्येत ४३.८६ टक्के रुग्ण या १८ दिवसात वाढले आहे. मुंबईत ३६.८८ टक्के रुग्ण या १८ दिवसांत वाढले. तर बळींच्या संख्येत जूनच्या या १८ दिवसांत महाराष्ट्रात ३७.१६ टक्क्यांनी वाढ झाली असून, मुंबईत ती वाढ ३५.१६ टक्के झाली असल्याचंही देवेंद्र फडणवीसांनी पत्रात नमूद केलंय.

यापूर्वी देखील फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहित कोरोना बळी लपवून ठेवल्याचा आरोप केला होता.

ट्रेंडिंग बातम्या-

“चिनी उत्पादनांवरील बंदीने चीनच्या अर्थव्यवस्थेवर काहीही परिणाम होणार नाही”

…म्हणून राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होतीये, आरोग्यमंत्र्यांचा महत्त्वाचा खुलासा

महत्वाच्या बातम्या-

सुशांतसिंगच्या मृत्यूनंतर आता अभय देओलचा धक्कादायक खुलासा

…म्हणून नाशिक प्रशासनाने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना दिला घरीच थांबण्याचा सल्ला

आता ‘या’ देशात अनोळखी माणसासोबत शरीरसंबंध ठेवता येणार नाहीत, कारण…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More