‘मी मुख्यमंत्री असताना शिवसेनेच्या नेत्यांनी…’; देवेंद्र फडणवीसांचा सचिन वाझेंबाबत मोठा गौप्यस्फोट
मुंबई | तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात वाझे यांची भूमिका संशयास्पद असल्याने गेल्या काही दिवसांपासून ते एटीएस आणि एनआयएच्या रडारवर होते. मात्र अशातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ते मुख्यमंत्री असतानाचा सचिन वाझेंबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
सचिन वाझे हे उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे निलंबित असतानाही त्यांना सेवेत घेण्यासाठी शिवसेनेच्या काही नेत्यांनी मी मुख्यमंत्री असताना माझ्याकडे आग्रह धरला होता. त्यावेळी मी वाझेंची फाईल अॅडव्होकेट जनरलना दाखवली होती. त्यावेळी त्यांनी मला वाझेंना सेवेत न घेण्याचा तोंडी सल्ला दिला असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुण्यात माध्यामांशी बोलताना त्यांनी सचिन वाझेंबाबतचा गौप्यस्फोट केला आहे.
सचिन वाझे यांना उच्च न्यायालयाने निलंबित केलं आहे. त्यामुळे त्यांना सेवेत घेता येणार नाही. तो कोर्टाच्या आदेशाचा अवमान होईल, असं मला वकील जनरलनी सांगितलं होतं. त्यामुळे मी वाझेंना सेवेत घेतलं नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनाी सांगितलं होतं.
दरम्यान, राज्यात सत्तांतर झालं आणि कोरोनाचं संकट आलं म्हणून निवृत्त झालेले अधिकारी सेवेत हवेत असं कारण देत सचिन वाझेंना पुन्हा पोलीस दलात घेतलं. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे क्राईम इंटेलिजन्स युनिट होतं. मात्र या विभागाचा प्रमुख हा पीआय असतो परंतू फक्त वाझेंसाठी पीआयची बदली करून एपीआय असलेल्या वाझेंना या विभागाचं प्रमुखरपद दिलं असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.
थोडक्यात बातम्या-
ही तर फक्त सुरूवात आता महत्वाचा भाग बाहेर येणं बाकी- देवेंद्र फडणवीस
झोमॅटो प्रकरणात खऱ्या-खोटाचा ‘हा’ व्हीडिओ आता होतोय प्रचंड व्हायरल, पाहा व्हिडीओ
‘तो डिलिव्हरी बॉय दोषी आहे, असं मला वाटत नाही’; झोमॅटोच्या कामराजला परिणीतीचा मदतीचा हात!
“मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला पाहिजे”
सोने इतक्या हजारांनी स्वस्त; जाणुन घ्या आजचा भाव!
Comments are closed.