विधीमंडळ गटनेतेपदी निवड होताच देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

Devendra Fadnavis | विधिमंडळ पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीसांचं (Devendra Fadnavis) नाव निश्चित करण्यात आलं आहे. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. उद्या 5 डिसेंबर रोजी फडणवीस यांचा आझाद मैदानावर ग्रँड शपथविधी सोहळा होणार आहे.

विधानभवनातील भाजप विधिमंडळ पक्ष कार्यालयात भाजपची (BJP) कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. यानंतर देवेंद्र फडणवीसांनी मोठं वक्तव्य केलं.

देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

भाजपच्या विधीमंडळाच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदा भाषण केलं. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी खरं म्हणजे राज्यातील जनतेला मी साष्टांग दंडवत घालतो, असा कौल दिला आहे, असं म्हटलं.

मोदींच्या नेतृत्वात देशात विजयाची मालिका लोकसभेनंतर हरियाणापासून सुरू झाली. महाराष्ट्राने जो कौल दिला आहे. खरं म्हणजे राज्यातील जनतेला मी साष्टांग दंडवत घालतो, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

देशाचे पंतप्रधान मोदी हे नेहमी सांगतात कोणत्याही धर्मग्रंथासाठी माझ्यासाठी संविधान सर्वात महत्त्वाचं आहे. एक असं संविधान त्याने प्रत्येक भारतीयांना मोठं होण्याचा अधिकार दिला. देशाला एक उत्तम राष्ट्र म्हणून प्रस्थापित करण्याचं काम केलं आहे. या अमृतमहोत्सवी वर्षात आपलं सरकार स्थापन करत आहोत, असं फडणवीसांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

अखेर ठरलंं! भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सर्वात मोठा निर्णय

आता केवळ ‘या’ पात्र महिलांनाच मिळणार लाडक्या बहिण योजनेचा लाभ; काय आहेत अटी?

महायुतीच्या शपथविधीसाठी उद्धव-राज ठाकरेंसह शरद पवारांनाही आमंत्रण; कोण-कोण लावणार हजेरी?

महायुतीत कुणाला किती मंत्रीपदं मिळणार?, सर्वात मोठी अपडेट समोर

बळीराजाची चिंता वाढली, IMD चा राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा!