बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सरनाईकांच्या लेटरबॉम्बवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन पानी पत्रं लिहून आघाडीतील मित्र पक्षांवरच तोफ डागली आहे. सरनाईक यांच्या या पत्रानंतर राजकारणात खळबळ उडाली आहे. कारण त्यांनी पत्रात भाजपशी जुळवून घेण्याचं आवाहन केलं आहे. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या पत्रावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रताप सरनाईक यांच्याप्रमाणेच अनेकांची इच्छा असू शकते. पण हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करतोय. जनतेचे प्रश्न आम्ही मांडत आहोत. आम्ही सिंगल लार्जेस्ट पार्टी होतो. पण आमच्याकडे बहुमत नव्हतं. येत्या काळात आम्ही बहुमताने निवडून येऊ, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

कुणी कुणाला जोडे मारायचे कुणी कुणाला हार घालायचे, हे त्यांनी ठरवावं. कुणासोबत कुणी जायचं आता त्यांनी ठरवायचं आहे. आमची बांधिलकी जनतेशी आहे. जनतेच्या बांधीलकीतून आम्ही काम करत राहू, असंही फडणवीस म्हणाले.

दरम्यान, सरनाईक जे आता सांगत आहेत, तेच तर आम्ही 18 महिन्यांपूर्वी सांगत होतो. पण तेव्हा तुम्ही ऐकलं नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. भाजपसोबत पुन्हा युती करायला हवी, असं सरनाईक यांनी पत्रात म्हटलं आहे. आता आम्ही याबद्दल आम्ही सकारात्मक बोलल्यास लगेच सामनामध्ये अग्रलेख येईल. सत्ता नसल्यानं यांच्या पोटात दुखत असल्याची टीका होईल, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या- 

दिलासादायक! महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणत घट, वाचा आजची आकडेवारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पहाटे देशाला संबोधित करणार!

चिंताजनक! देशातल्या ‘या’ राज्यात आढळला ग्रीन फंगसचा पहिला रुग्ण

“सोनिया गांधींनी शब्द दिलाय, काँग्रेस शिवसेनेसोबत पाच वर्षांचा कार्यकाळ पुर्ण करेल”

ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल न मिळाल्याने विद्यार्थीनीनं उचललं धक्कादायक पाऊल!

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More