बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाराष्ट्रात होणाऱ्या छाप्यांमागे देवेंद्र फडणवीसांचा हात”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मंत्र्यांवर केंद्र सरकारकडून तपास यंत्रणांचा वापर करून कारवाई करण्यात येत आहे, असा आरोप विरोधकांकडून वारंवार करण्यात येत आहे. त्यातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या सर्व कारवायांमागे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

राज्यात होणाऱ्या कारवायांमागे कोणता नेता असू शकतो असा प्रश्न नाना पटोले यांना करण्यात आला होता. त्यावर सगळेच नेते आहेत पण पहाटेला शपथ घेणारे सर्वांनाच ठाऊक आहेत. त्यांचे मंत्रिमंडळ झाले. त्यांचे 80 तासांचे सरकार हा महाराष्ट्रासाठी एक इतिहासच आहे. आता तर त्यांना दिवसादेखील स्वप्न पडायला लागलेत. ते सातत्याने दिल्लीला जाऊन पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना भेटत असतात, असं म्हणत नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर फटकेबाजी केली आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीवर आरोप करताना दिसत आहेत. त्यावरून नाना पटोले यांनी किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. किरीट सोमय्या आरोप लावण्यासाठी सुसाट सोडले आहेत. त्यांना काय बोलतो, काय नाही. कुठले पुरावे दाखवतो यात काही तथ्य नसते. ते केवळ राज्याला मनोरंजन देण्याचं काम करतात, असं टोला नाना पटोले यांनी किरीट सोमय्यांंना लगावला आहे.

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी  राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर काही आरोप केले होते. त्यावरून सोमय्यांनी  छगन भुजबळ यांच्यावर आरोप केले होते. त्यांना जेलमध्ये जावे लागले. मात्र, न्यायालयानेचं त्यांना निर्दोष सोडले. त्यामुळे सोमय्यांच्या आरोपाला तथ्यहिनच म्हणावे लागेल, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“त्यांना अटक करू नये, त्यांना व्यसनमुक्ती केंद्रात पाठवावं”

“विराटने खेळभावनेने पराभव स्वीकारला, मला त्याचं कौतुक वाटतंय”

दक्षिण आफ्रिका क्रिकेटमध्ये खळबळ! ‘या’ दिग्गज खेळाडूला संघातून वगळलं

मोठी बातमी! ड्रग्स प्रकरणात पहिला जामीन मंजूर; आर्यन खानला सुट्टी नाहीच

“नरेंद्र मोदींच्या नावावर शिवसेनेला 56 जागा मिळाल्या”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More