बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देवेंद्र फडणवीस यांचं सोनिया गांधींना पत्र, म्हणाले ‘ये पब्लिक है ना’

मुंबई | काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात देशातील 12 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रं लिहिलं होतं. या पत्रातून विरोधकांनी नरेंद्र मोदींना कोरोनाच्या संकटामुळे संसदेच्या सेंट्रल विस्टाचं प्रकल्पाचं काम थांबवण्यासह 9 महत्वाचे सल्ले दिले होते. त्यानंतर आता महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं आहे.

राज्यातील अन्य जिल्ह्यांचे प्रमाण 0.8 टक्के असताना एकट्या मुंबईत ते 40 टक्के आहे. मुंबईत दरवर्षी सरासरी 88 हजार मृत्यू होतात. पण, 2020 या वर्षांत यात 20,719 मृत्यू वाढले आहेत. यातील 11,116 मृत्यू केवळ कोरोनाचे दाखवले आहेत. म्हणजे प्रत्यक्षात 9603 कोरोना मृत्यू दडवले. गेल्यावर्षीचा हा क्रम याही वर्षी सुरूच आहे. आता यालाच महाराष्ट्र मॉडेल म्हणायचे का? आणि ते देशाने स्वीकारायचे का?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र यासारख्या भागांकडे सरकारचे पूर्ण दुर्लक्ष आहे. ग्रामीण भागात बेडस नाही, उपचार नाही, रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनसाठी संघर्ष आहे. शेवटी विविध न्यायालयांना हस्तक्षेप करत आदेश द्यावा लागला आहे. रेमडेसिवीरच्या काळाबाजारीत सरकारी डॉक्टर पकडले जातात, तर त्यांचा पीसीआर सुद्धा मागितला जात नाही, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.

केंद्र सरकारवर टीका करताना काँग्रेसची किंवा काँग्रेसच्या पाठिंब्यांनी चालणाऱ्या सरकारांना सुद्धा सल्ला देणे हे काम सुद्धा सोनिया गांधींनी केले पाहिजे, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.  भारतीय वॅक्सिनला नाकारणारा काँग्रेस पक्ष आज त्यावरच राजकारण करताना दिसून येतो. अर्थात भारतीय वॅक्सिनबाबतीत काँग्रेसचा विश्वास वाढतोय, असं देखील त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, ‘ये पब्लिक है ना, सब जानती है’, असा टोलाही त्यांनी पत्राच्या शेवटी लगावला आहे. संकटात केवळ राजकारण न करता काँग्रेस पक्ष एका रचनात्मक विरोधी पक्षाची भूमिका वठवेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.

पाहा पत्र-

 

थोडक्यात बातम्या-

‘माझ्या प्रश्नाचं किंबहुना उत्तर देणार का?’; गोपिचंद पडळकर यांचं उद्धव ठाकरेंना पत्र

UPSC मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या ‘त्या’ 22 उमेदवारांना बार्टीमार्फत ऑनलाईन प्रशिक्षण!

गंगेच्या पात्रात 2 हजारपेक्षा जास्त मृतदेह, ‘या’ प्रख्यात वृत्तपत्राचा धक्कादायक दावा

“फडणवीसजी तुम्हाला माशा मारण्याशिवाय कामच काय उरलंय”

कोरोना लसीमुळे सीरम मालामाल; नफ्याचा आकडा ऐकाल तर थक्क व्हाल!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More