बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“देवेंद्र फडणवीसांचं मानसिक संतुलन बिघडलंय”

मुंबई | राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतत आघाडी सरकारवर टीका करताना दिसतात. राज्यात यावर्षी पावसानं मोठं नुकसान केलं आहे. महाविकास आघाडीचे नेते आणि विरोधी पक्ष भाजपचे नेते यांनी मराठवाड्याची नुकसान पाहणी केली. दरम्यान दोन्ही पक्षातील नेत्यांनी एकमेकांवर आरोप  केले होते. आता मुंबई काॅंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

विधासभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतच मला अजुनही राज्याचा मुख्यमंत्री वाटत असल्याचं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर राज्यभरातून फडणवीस यांच्यावर जोरदार टीका झाली होती. भाई जगताप यांनी फडणवीस यांच्या याच वक्तव्याचा चांगलाच समाचार घेत फडणवीस यांचं मानसिक संतुलन बिघडल्याची टीका केली आहे.

पाच वर्षात राज्याची वाट लावणारा मुख्यमंत्री कोण असेल तर ते फडणवीस आहेत, या तिखट शब्दात भाई जगताप यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. कधी झालं नसेल येवढं नुकसान फडणवीस यांच्या काळात झाल्याचंही जगताप म्हणाले आहेत. फडणवीस यांनी मुंबई आणि महाराष्ट्रासाठी काहीच केलं नाही, असंही जगताप म्हणाले आहेत.

दरम्यान, आगामी काळातील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाई जगताप यांनी उल्हासनगर येथे आढावा बैठक घेतली. या बैठकीत भाई जगताप यांनी फडणवीस आणि गडकरी दोन्ही नेत्यांवर खरमरीत टीका केली.

थोडक्यात बातम्या 

“सावरकर देशातील स्वातंत्र्य वीरांचे मुकूटमणी, पण भाजप नेत्यांनी…”

पुढील 4 दिवस महत्त्वाचे! राज्यातील ‘या’ 14 जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

मोठी बातमी! शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याला उच्च न्यायालयाचा दणका

सोनं-चांदी खरेदी करण्याआधी इथे तपासा लेटेस्ट भाव एका क्लिकवर

“भारतीय नागरिक आरएसएसमुळेच सुरक्षित, त्यांच्यामुळे देशाला शांती लाभली”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More