मुंबई | राज्यविधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू आहे. चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवल्यानंतर गोव्यातील विजयाचे शिल्पकार ठरलेले राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं विधानभवन परिसरात जंगी स्वागत करण्यात आलं.
भाजप कार्यकर्त्यांकडून व आमदारांकडून ढोल ताश्याच्या गजरात देवेंद्र फडणवीसांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी मिशन महाराष्ट्रची घोषणा केली आहे. यासोबतच चार राज्यातील विजयानंतर आता कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे निर्देश देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत.
आज विजय साजरा करा पण उद्यापासून कामाला लागा. भाजपचं पूर्ण बहुमत सरकार आणण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज राहिलं पाहिजे, असं म्हणत फडणवीसांनी आतापासूनच त्याचं मिशन महाराष्ट्र सुरू केलं आहे. मिशन महाराष्ट्रसाठी भाजपचं पहिलं लक्ष्य मुंबई महापालिका असणार आहे.
दरम्यान, चार राज्यात भाजपने मुसंडी मारल्यानंतर महाराष्ट्रातही भाजप नेते व कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. मुंबई महापालिका भ्रष्टाचाऱ्यांच्या विळख्यातून बाहेर काढण्याची जबाबदारी आता आपली आहे. ती जबाबदारी पार पाडायची, असंही फडणवीस म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
‘मी दु:खी होऊन बसत नाही,मी…’; तेजश्री प्रधानची ‘ती’ पोस्ट व्हायरल
‘महाविकास आघाडी सरकार पडलं की…’; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
“आम्ही आणखी लढू, कधी ना कधी यश येईल”
ऐतिहासिक विजयानंतर योगी आदित्यनाथ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
पाच राज्यातील निकालानंतर भाजपची मोठी घोषणा! आता मुंबई…
Comments are closed.