बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांचा पुन्हा पेनड्राईव्ह बॉम्ब, म्हणाले…

मुंबई | यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आरोप करताना पेन ड्राईव्ह देखील दिले आहेत. सरकारी वकिल आणि राज्यातील कारवायांसंदर्भातील संभाषण देवेंद्र फडणवीसांनी वाचून दाखवली आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांनी पेन ड्राईव्हच्या माध्यमातून आरोप केले आहेत.

मुंबईतील स्थायी समितीच्या अध्यक्षांकडे जेव्हा धाड पडली तेव्हा 130 कोटी रूपयांची संपत्ती सापडली. त्यानंतर वाढता वाढता 300 कोटी बेहिशोबी मालमत्ता सापडली. दोन वर्षांत 38 संपत्ती जमवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. एकीकडे लोक कोरोनामुळे मरत होते  आणि काही लोक संपत्ती खरेदी करत होते, असा घणाघात देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

मुंबई महापालिकेतील स्थायी समितीच्या शेवटच्या बैठकीत 6 हजार कोटी रूपयांचे 370 प्रस्ताव फक्त 30 मिनिटांमध्ये मंजूर केले. अनेक योजनांचा विषय निघाला मात्र, नालेसफाईचा विषय निघाला नाही. 7 मार्च रोजीचं स्थायी समितीच्या बाहेरचं सीसीटीव्ही फुटेज पहा, काय लाईन लागली होती ती, भयानक होती. आजकाल पेनड्राईव्ह दिला तर लोकांना राग येतो, असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.

दरम्यान, तुम्हाला पेनड्राईव्ह  हवा असेल तर तिथल्या लागलेल्या लाईनमध्ये कोणं कोण होतं, कोण बाहेर जात होतं, कोण आत जात होतं, याचा  पेनड्राईव्ह  द्यायला मी तयार आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. आमची चुक झाली आम्ही मविआ म्हणजेच महाविकास आघाडी समजत होतो. मग लक्षात आलं की, ही महाविनाश आघाडी आहे. त्यानंतर समजलं की, महावसुली आघाडी आहे, अशी तोफ फडणवीसांनी डागली आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘ये डर होना जरूरी है’, चंद्रकांत पाटलांचा आव्हाडांना खोचक टोला

“मुंबईचा विचार फक्त सोन्याची अंडे देणारी कोंबडी म्हणून केला गेला”

काही दिवस ‘या’ जिल्ह्यांत पाऊस पडण्याची शक्यता, हवामान खात्याचा गंभीर इशारा

ईडीच्या सततच्या कारवाईवर संजय राऊत म्हणतात…”मला तर भिती वाटतेय”

“दोन हात करायची वेळ आली तर शिवसैनिक कमी पडणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More