बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई | पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहामध्ये गदारोळ झालेला पाहायला मिळाला. यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं दिसलं. त्यासोबतच अध्यक्षांच्या दालनाबाहेर धक्काबुक्कीही झाली तर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनाही धक्काबुक्की आणि शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे भाजपच्या 12 आमदारांवर एक वर्षासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

भाजपच्या 12 आमदारांवर कारवाई केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी यावर प्रतिक्रिया देताना राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर आम्ही सरकारला उघडं पाडलं. एकाही भाजपच्या सदस्यानं शिवी दिली नाही शिवी देणारे कोण होते हे सगळ्यांनी पाहिलंय ते शिवसेनेचे सदस्य होते त्यांनीच धक्काबुक्की केली. आशिष शेलार यांनी भास्कर जाधव यांच्याशी सर्वांच्यावतीनं क्षमा मागितली आणि तो विषय संपवून बाहेर आलो. पण आमच्या आमदारांच्या निलंबनासाठी स्टोरी रचण्यात आली असल्याची टीका फडणवीसांनी केली आहे.

आम्ही हे सरकार अपयशी ठरलं हे दाखवून दिलं. सरकारनं खोटे आरोप लावून 12 आमदारांना निलंबित केलं आहे. जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत आम्ही हा मुद्दा लावून धरणार. आत्तापर्यंत नेहमीच असे प्रकार घडले परंतु कुणी कधी निलंबित झालं नसल्याचं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, निलंबित करण्यात आलेल्या आमदारांमध्ये भाजपचे आशिष शेलार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, अभिमन्यू पवार, जयकुमार रावत, राम सातपुते, नारायण कुचे, हरीश पिंपळे, पराग आळवणी, संजय कुटे, किर्तिकुमार, योगेश सागर यांचा समावेश आहे.

थोडक्यात बातम्या- 

अधिवेशनात गोंधळ घालणार्‍या भाजपच्या 12 आमदारांवर एक वर्षांसाठी झाली ‘ही’ कारवाई

पावसासाठी आता ‘या’ तारखेपर्यंत पाहावी लागणार वाट; शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट

सरकारला धारेवर धरल्याशिवाय आम्ही राहणार नाही- प्रविण दरेकर

कोणतीही धक्काबुक्की झालेली नाही, आम्ही त्यांना पुरुन उरलो- देवेंद्र फडणवीस

वारीला बंदी हे द्रौपदीच्या पदराला हात घालण्याचं पाप- संभाजी भिडे

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More