बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ज्यांचा संबंध नाही त्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा टाळा’; शरद पवारांच्या आवाहनावर फडणवीस म्हणाले,’मी तर विरोधी पक्षनेता’

मुंबई | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज राज्यात झालेल्या अतिवृष्टीवर पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयावर भाष्य केलं. महत्त्वाचं म्हणजे शरद पवारांनी अतिवृष्टी झालेल्या भागात ज्यांचा संबंध नाही त्यांनी दौरा करणं टाळावा, असं आवाहन केलं होतं. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रितिक्रिया दिली आहे.

राज्यात जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा मदतकार्य होणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे कोणत्याही नेत्यानं प्रसंगावधान राखलं पाहिजे. अशा प्रकारचे दौरे केल्याने यंत्रणा त्यांच्यासाठी फिरवावी लागत असल्याचं शरद पवार म्हणाले होते. यावर, मी तर विरोधी पक्षनेता आहे. आम्ही जातो तेव्हा शासकीय यंत्रणा फारशी तिथे नसतेच. कारण सरकारनं तसा जीआरच काढलेला आहे, असं फडणवीस म्हणाले.

आमचे दौरेही महत्त्वाचे आहेत कारण आम्ही गेलो तरच शासकीय यंत्रणा जागी होते आणि कामाला लागते. पवारांच्या आवाहनाचा अर्थ एवढाचा घ्यायला हवा की, रेस्क्यू ऑपरेशन किंवा मदतकार्य आपल्यामुळे थांबता कामा नये. त्यामुळे त्यांचं म्हणणं बरोबर आहे, असं फडणवीस म्हणाले. त्यासोबतच फडणवीसांनी आपण येत्या तीन दिवसाता दौरा करणार असल्याचंही म्हटलं आहे.

दरम्यान, अशा घटनानंतर अनेक लोक गाड्या घेऊन त्या ठिकाणी जातात. माझं आवाहन आहे, आता शासकीय यंत्रणा पुनर्वसनाच्या कामात व्यस्त आहेत. त्यांचे लक्ष विचलित होईल, त्यामुळे असे दौरे टाळावे, असं पवारांनी सांगितलं होतं.

थोडक्यात बातम्या-

‘महाराष्ट्रातील नेता जर…’; उद्धव ठाकरेंकडे राष्ट्रीय स्तराचं नेतृत्त्व देण्याबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य

“राज्यपाल नेहमी घटनेचं पुस्तक वाचून काम करतात, पुस्तक पुरात वाहून गेलं का पाहावं लागेल”

“केंद्र सरकार आमचा बाप असून केंद्रातील मंत्र्यांनी दोन हजार कोटींचा चेक घेऊन यावं”

…जेव्हा शरद पवार पंतप्रधानांना म्हणतात,’किमान 10 दिवस तरी येऊ नका’

पूरग्रस्तांच्या आर्थिक पॅकेजबाबत अजित पवार म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More