बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना तातडीचं पत्र; केलं ‘ही’ मोठी मागणी

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात येत आहे. त्यामुळे आता काही निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. तर काही निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. देशात लवकरच तिसरी लाट येण्याची शक्यता असल्यानं निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. त्यातच आता राज्यात लावण्यात आलेले सर्व निर्बंध काढून टाकण्याची मागणी केली जात आहे. याच पाश्वभूमीवर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना तातडीचं पत्र लिहिलं आहे.

सातत्यानं लावण्यात येणाऱ्या लाॅकडाऊनमुळे विविध छोटे व्यवसायिक आणि दुकानदारांची स्थिती हालाखिची झाली आहे. आता कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात येत असल्यानं या दुकानदारांना दिलासा देण्याची गरज असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे म्हटलं आहे. त्यामुळे नागपूरमध्ये तातडीने निर्बंधात शिथीलता देण्यात यावी, असं त्यांनी म्हटलं आहे.

अर्थकारण आणि आरोग्य याचा सुवर्णमध्य काढावा लागेल. कोरोना विरूद्धची लढाई एकांगी होता कामा नये. आर्थिक टंचाईमुळे व्यापारी आपलं आयुष्य संपवत आहे. नालासोपारा, कल्याण, चंद्रपूर या ठिकाणी अशा घटना घडत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर व्यापाऱ्यांना सुट देण्याची गरज असल्याचं फडणवीसांनी सांगितलं आहे.

दरम्यान, राज्यात ठिकठिकाणी कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे, त्यामुळे काही ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी, ते पुर्णपणे हटवण्यात आले नाहीत. याबद्दल टास्क फोर्स अभ्यास करत असून मुख्यमंत्री लवकरच याबाबत निर्णय जाहीर करतील, असं सुचक वक्तव्य राजेश टोपे यांनी केलं होतं.

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा ताजी आकडेवारी

‘भारत जातीवादाने नाही तर वर्णभेदानेही बाधित आहे’; मिलिंद सोमणची पत्नी अंकिता संतापली

धक्कादायक! पुणे नगरसेवकांचा भोंगळ कारभार उघड, पालिकेच्या पैशांवर सुरू आहेत ‘ही’ कामे

हाच खरा बाहुबली! डोक्यावर दुचाकी उचलणाऱ्या तरूणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

दिलासादायक! मुंबईची वाटचाल कोरोनामुक्तीकडे, वाचा आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More