“उद्धवजी टोमणे मारणं सोडत नाहीत आणि माझी पत्नी…”; फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
मुंबई | राज्याच्या राजकारणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सध्या शीतयुद्ध रंगलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. त्यावर बोलताना फडणवीस यांनी ठाकरेंना चिमटा काढला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझ्या पत्नीत एक साम्य आहे. उद्धवजी टोमणे मारणं सोडत नाहीत आणि माझी पत्नी नको त्या गोष्टीला उत्तर देणं सोडत नाही, असं फडणवीस म्हणाले आहेत. मुख्यमंत्री म्हणून उद्धवजींनी आपली पातळी ठेवली पाहीजे, असा सल्लाही फडणवीसांनी ठाकरेंना दिला आहे.
फडणवीसांनी यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतल्याचं पहायला मिळालं आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले आणि मर्सिडीज बेबी असलेल्यांना संघर्ष करावा लागत नाही, असंही फडणवीस म्हणाले आहेत.
दरम्यान, बाबरी मशीद पाडताना आपण त्याठिकाणी होतो या फडणवीसांच्या वक्तव्याची आदित्य ठाकरेंनी खिल्ली उडवली होती. त्यावरून आदित्य ठाकरेंना भाजप नेते ट्रोल करत आहेत.
थोडक्यात बातम्या –
नवनीत राणा आणि रवी राणांना जामीन मंजूर, मात्र…
‘…तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहणार’, राज ठाकरे स्पष्टच बोलले
“जयंत पाटलांचं गणित बघून त्यांच्या गणिताच्या शिक्षकांना पश्चाताप होत असेल”
सर्वात मोठी बातमी! राणा दांपत्याला जामीन मंजूर
बाळासाहेबांचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत राज ठाकरेंचा शिवसेनेवर हल्लाबोल
Comments are closed.