बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘राज्यपालांच्या वक्तव्याशी मी सहमत नाही’, फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं

मुंबई | राज्यपाल भगत सिंग कोश्यारी( Bhagat Singh Koshyari) यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केल्याने ते सध्या चर्चेत आहेत. राज्यपाल कोश्यारी हे एका कार्यक्रमात म्हणाले की, गुजराती आणि राजस्थान माणसे  मुंबईतून गेले तर मुंबईत काय उरेल?, यावर आता अनेक राजकीय पक्ष तसेच सामान्य जनता टीका करत आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकरणात चांगलीच खळबळ उडाली आहे.

अनेक राजकीय पक्षाने प्रतिक्रीया व्यक्त केल्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनीही राज्यपालांच्या वक्तव्यावर आपले मत व्यक्त केले आहे. फडणवीस म्हणाले की, मी राज्यपालांच्या वक्तव्याशी सहमत नाही, असं म्हणत त्यांनी मुंबईच्या यशात मराठी माणसचा वाटा आहे, असं सांगितले.

महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या प्रगतीत संपूर्ण मराठी माणसाचा वाटा आहे. मराठी उद्योग आणि व्यावसायिकांचा वाटा आहे. तसेच मराठी साहित्यीकांचा, मराठी लेखकांचा देखील मुंबईला आणि महाराष्ट्राला समृद्ध करण्यात वाटा आहे. त्यामुळे आपण राज्यापालांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे.

दरम्यान, आता राज्यपालांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. नेहमीप्रमाणे माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. मी जे बोललो ते वेगळ्या अर्थाने बोललो होतो. मला अभिमान आहे की छत्रपती शिवरायांचा आणि इतर महापुरूषांचा इतिहास असलेल्या महाराष्ट्रात मला राज्यपाल होण्याची संधी मिळाली, असं स्पष्टीकरण राज्यपालांनी दिले आहे.

थोडक्यात बातम्या-

“हे पार्सल आता उत्तराखंडला पाठवण्याची वेळ आलीये”

‘कोश्यारींना कोल्हापूरी जोडा दाखवण्याची गरज’, उद्धव ठाकरे भडकले

‘राज्यपाल कोश्यारींनी राजीनामा द्यावा’, संजय राऊत संतापले

बाळासाहेबांचे दुसरे नातू शिंदे गटात सामील, उद्धव ठाकरेंना मोठा झटका

तनुश्री दत्ताचे नाना पाटेकरांवर पुन्हा एकदा गंभीर आरोप, सुशांत सिंह राजपूतचाही केला उल्लेख

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More