बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धमक्या द्याल तर लक्षात ठेवा; कर्जत-जामखेडमध्ये मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादीला दम

अहमदनगर | लोकशाही आहे प्रेमानं मतं मागा, धमक्या द्याल तर तुम्हाला उत्तर देण्याची धमकही आमच्यात आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर दम भरला. प्रा. राम शिंदे यांच्यासाठी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात आयोजित विजय संकल्प सभेत ते बोलत होते.

आम्हाला जर निवडून दिलं नाही तर आम्ही तुमचा ऊस घेणार नाही, अशी भाषा करणाऱ्याला शेतकऱ्याला नागवणाऱ्या आणि नडणाऱ्याला गाडल्याशिवाय राहणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

रामभाऊ तुम्ही अजिबात काळजी करू नका, सरकार आपलं आहे… यांच्या कारखान्यानं जर शेतकऱ्यांचा ऊस विकत घेतला नाही, तर नवीन कारखाना उभा करा. लोकशाहीमध्ये धमकीला जागा नाही. धमकी देणाऱ्यांची जागा जनता कुठे आहे ती दाखवते, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

दरम्यान, नगरमध्ये अंबालिका सहकारी साखर कारखाना असून हा कारखाना राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. त्यावरुन मुख्यमंत्र्यांनी वरील वक्तव्य केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More